Saturday, December 1, 2007

किति त्रास देतेस मजला

किति त्रास देतेस मजला
काहिच सुचु देत नाहि
प्रिये तु समोर अशी उभी
कवितेस विषय सुचत नाहि

लांब रेशमी कुंतळ काळे
ओल्या अधराचे चंचल चाळें
मोहक नयनांच्या त्या कोंदणी
उमलली जणु शुक्राची चांदणी

मुर्तिम्ंत् सौंदर्य ,तु लावण्यमुर्ती
विश्वामित्रास हि चळ भरे
तव सहवास आम्हास लाभला
मम गत जन्मीचे भाग्य खरे.


इतके गुंतणे ठीक नाहि
लोक बघ कुजबुजु लागले
त्यातले काहिजण तर आम्हा
तुलसी दास म्हणु लागले

मारलीस रेशमी मीठी मजला
अनंगास्त्रानी मजवर वार करे
लिहि गीत,अन् ऎकव मजला
अन अशी वर फर्मा‌इश करे

सांग कसे लिहु गीत सखे
हात उरोज छेडण्यात गुंतले.
सांग कसे गा‌उ गीत सखे
अधर चुंबनात गुंतले

1 comment:

Makarand said...

काका,
येक्दम ज़कास..