Saturday, February 14, 2009

सौंदामीनि....................

सौंदामीनि....................
घेतलि मिठित जिला ति
साक्षात मेघ दामिनि होति
मिठित कमिनि नव्हे हो
ति सळसळति नागिण होती

रक्तवर्णी ते अधर होते
रुधिर गरम उष्ण होते.
काया कापुर झालि होति
मिठित धगधगति आग होति.

शशी समान चेहेरा होता
नयन नक्षत्रांचा पहारा होता
नयनात चेटुक गारुड होते,
काळिज निकामी झाले होते.

मधाळ यौवनचि मिठि होति
किसे खबर दिन या रात्र होति
वेळ तर कयामत चि च होति
मिठित सुवर्णरंगी आग होति

माहित होते मित्रांनो आम्हाला
ति विज आम्हा जाळणार होति,
पण काहि तक्रार नव्हति आमचि
ति परमसुखचि तर नांदि होति.

No comments: