Saturday, February 14, 2009

गध्धे पंचविशी

गध्धे पंचविशी

गध्धे पंचविशी
ते दिवसहि कसे मंतरलेले होते
ति वेळ हि तशी वेडीच होति
तु विशीतली कोवळी कळी होति.
माझीहि गध्धे पंचविशी चालु होति

तुझ्या घराच्या वा~या नित्य कर्मकांड असे
दर्शनासाठि तुझ्या नेत्र आसुसलेले असे.
तुझ्या प्रेम कटाक्षाने दिवस कारणी लागत असे
जळि स्थळि सखे तुझिच मुर्त मज दिसे

तुझ्या सहवासाचि साजणे ओढ असायची
हातात हात घालुन मीरवण्याचि हौस असायची
दिवस होता कि रात्र याचि फिकिर नसायचि
रखरखित दुपार हि कोजागिरीचि रात्र वाटायचि

तु देखणी अन माझ्यात तारुण्याचा जोश होता
दोघांच्याहि मनात नेमका तोच विचार होता
मन संस्कारित, म्हणुन संयमाचा बांध होता
तरी पहिल्या चुंबनाचा नशा काहि और होता

होंडा बाईक,अन तु माझी दिलोजान होति
हिंडा फिरायचि तुलाहि फार हौस होति
मागे तारुण्याचि घट्ट मिठि घालुन घालायची
उरोज स्पर्शाने माझि कानशिले वाफाळायची


आठवले कि अंगावरची वर्षे गळून पडतात
तनास अन मनास तारुण्य पालवि फुटते
आठवते ते दिवसहि तसे मंतरलेले होते
ति वेळ हि तशी वेडीच होति
तु विशीतली कोवळी कळी होति.
माझीहि गध्धे पंचविशी चालु होति

avinash

No comments: