Thursday, July 12, 2007

उखाणा



उखाणा
तुझा ढंग निराळा हसण्याचा
मनांत कल्लोळ शतरंगी स्वप्नांचा.

झुरतेस तु मजसाठी वेडी,
यौवन गंधाने केली हि चहाडी,

तु मधाळ हसता, प्रीत हसे,
फितुर डोळे,गुपीत राखील कसे,

जरी हि अठी ,सखे तुझ्या भाळी,
गुलाबाचा रंग पण चढलाय गाली,

सोड हा सखे, लटका प्रतिकार
खुलतो राग चेहे~यावर,मनोहर,

विचारतेस मनाला, हेच प्रेम असे?
अन ऎकता हे वसंत,तनुमधे हसे,

प्राशु दे मकरंद, तव अधराचा,
मग सुटेल उखाणा,तव यौवनाचा,

ये मिठीत,दे चुंबन तु मजला,
मिळतील उत्तरे, प्रेम प्रश्णाची तुजला

जे शब्द अधरावरती थबकले,
उमटले तनुवर, बनुनी नखक्षतांची फुले.

No comments: