Saturday, July 28, 2007

तुझ्या प्रतिक्षेत


धुंद होते लोचन
धुंद भर्जरी यौवन
उठे मुक प्रेमगीत
लाडक्या तुझ्या प्रतिक्षेत

स्मर ती भेट युगांची
रात्र ति पौर्णीमेची
रत, रोहिणीत चंद्र्मा
रोहीणी गाली रक्तीमा

स्पर्शीतोस तनुस माझ्या
घसरतो उरीचा पदर
अन करतोस अवेगानें
लाल अधर ऒलसर


वक्षावर ठेवला माथा,
मन बेभान झाले,
तुझी मिठी जादुंची
अंग ऒलसर झालें.

माझ्यातली रति तु,
बेभान धुंद केली
माझ्याच गात्रांची मजला
नव्यानेच ऒळख झाली

No comments: