Sunday, October 14, 2007

किनारा

समोर तु ,रतिचे रुप
एकदा पाहुन,मन भरेना

मनाला किति,आवरु सावरु
नजर वळते.पुन्हा पुन्हा

कमनिय देह,तारुण्याची साय
वक्षांचा उभार.चुरते नजर

कायेचा स्पर्श.स्पर्श कायेला
मिठी रेशमी,रेशमी गुंता

देहात काम,अंगास घाम
घामाचा वास,त्याचिच आस.

डोळ्यात माझ्या.कसले तुफान्
तुफानात् गलबत्.घायाळ् तांडेल्

ह्या तांडेलास्.तुझा सहारा
ह्या गलबतास् आता फक्त्...तुझा किनारा





1 comment:

Ruchi@ said...

kavita khupach sundar aahe...