Monday, October 8, 2007

तोल माझा गेला होता.

रात्र चांदणी होति, अंधार माजला होता,
त्या रात्रीचे काय सांगु, पाय घसरला होता.

त्या काळ्या कुंतलात, शशि चमकत होता
नेत्र शांभवि पिताना,तोल माझा गेला होता.

सभ्य संयमीत मी, वक्षावर नजर घसरली
ढळला पदर तुझा, अन, नियतित खोट आली

हातात हात घेता,हात तु सोडवुन घेतला
भिति तुला वाटत होति, पण स्पर्श हवहवासा वाटला

मंद वारे वहात होते, शांत होते आसमंत,
रात्र होति वादळी, बदलले आपले विश्व

संपली रात्र केंव्हा, ना कळले तुला न मला
कळिचे फुल उमलले,ना कळले तुला न मला

ति रात्र वादळी होति , कि दोष माझा होता.
वाट निसरडी होति, पाय घसरला होता

No comments: