Thursday, October 4, 2007

तु कोण आहेस माझा

तु कोण आहेस माझा

आल अधरातिल तु, मकरंद आहेस माझा
ह्या गात्रांत पेटलेला,वणवा तु आहेस माझा

चंद्र तु आहेस माझा,नयनातिल तारा तु माझा
मदन चाळे खेळणारा,सखा सौंगडि आहेस माझा

रेशमी कुंतलात दरवळणारा,कामगंध तु आहेस माझा
कर्ण पाकळीस छेडणारा,खट्याळ तु मीत माझा

त्या दिर्घ चुंबनातिल, थांबलेला श्वास तु
ओसरली प्रणय लाट,तरी तनुत उरलेली ओल तु

रेशमी काचोळीत बांधलेले, ते कोवळे यौवन तु
दिनरात मनांत गुंजणारे, लाजरे प्रेमगीत तु

टपो~या या नयनातिल, काजळाची रेघ तु
बिलगणारी वक्षास,मोत्याची नाजुक माळ तु

तु प्रेमसखा माझा, तु काम सखा माझा
नाहि जगु शकणार ज्याशिवाय,
असा श्वास तु आहेस माझा




No comments: