Wednesday, January 5, 2011

एक मुक्तक

एक मुक्तक

विचारांच्या युध्दात जर कोणाचा बळी जात असेल तर तो आहे माणसाचा!” ” लोक पैसा व सत्तेसाठी खून करतात. पण सर्वात निष्ठुर खुनी आपल्या विचारधारेसाठी खून करतात.’

विचारात कोट्यावधी अणुबॉंब इतकी ताकद असते हे खरे...एखाद्या विचार धारेने प्रभावित झालेले माणसे वा समुह आपल्या विचारधारेसाठी कुठल्याहि थराला जावु शकतात..

आर्यांचे वंश श्रेष्टत्व या विचाराने हिटलर भारावुन गेला होता..वर्ण संकर त्याला मान्य नव्हता..लाखो ज्युज मृत्यूमुखि पडले...गंमत म्हणजे चर्चिल जो हिटलर चा विरोधक होता त्याला माईन काम्फ मधले हे हिटलरचे वंश श्रेष्ठता संबंधिचे विचार मान्य होते....

रशियन देषात क्रांति झाली कार्ल मार्क्स ची विचारधारा म्हणजे देवाचि आज्ञा झाली...ज्यांना ति विचार धारा मान्य नव्हति अश्या लाखो लोकांना स्टॅलिन लेनिन ने यमसदनाला पाठवले...साम्य वादाचा विचार रुजवण्या साठी मोठ्या प्रमाणात दडपशाहि झाली...अन शेवटी मुळात ति विचार सरणीच फुसकी ठरली...लोकांनी साम्यवाद नकारला...स्टॅलिन .लेनिन.मार्क्सचे पुतळे लोकांनी समुद्रात बुडवले....

स्वातंत्रा नंतर समाजवादाच्या विचाराने भारतातले शिर्श नेते फार प्रभावि झाले होते..समाजवाद म्हणजे परवलीचा शब्द झाला होता...सगळीच कामे सरकार करु लागली...हॉटेल चालविणे,अवजड उद्योग,बॅंकिंग..अश्या अनेक उपक्रमाचा जन्म झाला..शेवटी यासा~या व्यवसायात व्यवसायाचे मुख्य तत्व "नफा" हेच विसरले गेले अन सारे उद्योग म्हणजे नोकरदारांचे अड्डे झाले...त्याच संप, खोटी नोकरभरती असे अनेक गैरप्रकार शिरले....या समाज वादी विचारांना जेंव्हा विरोध होवु लागला तो मोडण्या साठी..श्रीमति गांधि यानी समाजवाद हे घटनेचे कलम केले व त्या साठी घटना दुरुस्ति झाली...शेवटी उत्पादन कमी व खर्च भरपुर त्या मुळे सारा देष आर्थिक द्रूष्ट्या डबघाईला आला...सोने गहाण पडले व शेवटी भारताने समाज वादाचा त्याग करुन मुक्त अर्थ व्यवस्थेची कास धरली.....

वैशण्व व शैव..प्रोटेस्टंट व कॅथलिक या विचार धारांचा वाद पण प्रसिध्द आहे..त्या साठी अनेक धर्मयुध्दे झाली...

रामजन्म भुमीच्या विचाराने पेट घेतला..व लोकांनी आपल्यी विवेक बुध्दीशी फारकत घेतली..हिदुत्वचे हिंसक रुप पुढे आले..अन बघता बघता लाखो लोकांनी मशिदिचे चुर्णात रुपांतर केले..आणि हजारो लोक मृत्युमुखि पडले...नंतर केवल सत्तेसाठी हा खेळ होता हे लक्षात आले अन हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भा.ज.प. सरकार सपशेल हरले...

अल्ला सर्वश्रेश्ठ व मुर्तिपुजा मंजुर नसलेल्या माथेफिरुंनी एका हातात कुराण व एका हातात तलवार घेवुन सारे जग इस्लाम करण्या साठी जगाशी वैर घेतले..व लाखो निरपराध लोक मृत्युमुखि पडले...

असे अनेक विचार जगात आले व येत रहातिल ..एखाद्या विचासरणीची नशा चढली कि मानवसमुह विवेक बुध्दी हरवुन बसतो...एका थोर विचावंताने नमुद केलेच आहे कि

"मनुष्य जातिचा सारा इतिहास क्रौय व हिंसाचाराने रंगलेला आहे....

No comments: