Wednesday, February 6, 2008

प्रेम रोग

त्याच्या एका कटाक्षाने घायाळ झाले
त्याच्या मधु हास्यावर मोहित झाले
रात्री नाहि निद्रा,दिवसा चांदणे दिसु लागले
मी माझीच होते पण आता मी माझी न राहिले ...
कोणी सांगेल का .... काय मला हे झाले ???

अग सखे ऎक बोल अनुभवाचे....

त्या चित्त चोरांने, तुला पुरते लुट्ले ग
तुलाच तुझ्यापासुन, पळवुन नेले ग

आता तु कशी राहशिल सखे तुझी तु
त्याच्या मोहमयी प्रेम पाशात अडकलीस तु

हा आजार गोड फार, पण जिवघेणा असे
लक्षणे तर दिसतात, प्रेम रोगाची सखे

हा रोग मुरे शरिरी, वेदना थेट काळजास
हकिम, वैद्य, थकले, नाहि दवा या रोगास.

अनुभवाचे बोल ऎक तु,एकच यावर उपाय असे.
प्रियकराचे दर्शन,हा खात्रीचा उपचार असे

भेट त्याला उपवनी,नभात शरद चांदणे असे
चुंबनालिंगने,सहवास,हिच त्या रोगावर दवा असे

अविनाश.............

No comments: