Saturday, February 9, 2008

रुसवा...

माळण्यास आणली आहेत मी
ही शुभ्र फुले मोगऱ्याची
का रुसलीस प्रिय सखे
काय झाली चुक पामराची.......

पौर्णेमेची ही रात्र आहे सखे
धवल चंद्र बघ नभी उगवला
काय खता झाली प्रिये माझी
माझा चंद्र का बरे रुसला???.....

नजर इकडे तिकडे भिरभिरलेली
गौर वर्ण,नाजुक नासीका फुललेली
अधर पाकळी दाता खाली दाबलेली
गोड दिसतेस, जरी असली रुसलेली........

स्पर्शीता तनुस ,का हात झिडकारतेस?
भामीनि मी प्रिय सखा,का दुर लोटतेस??
मनवण्यात जरी प्रिये, मध्य रात्र उलटली
पण प्रणयाची धुंदि नाहि अजुन उतरली........

सुहास्य वदने, सुंदरी, रुसवा सोड हा
मान्य चुका, जरी नसतिल मी केल्या
संपव अबोला, अन छळवाद, तु हास,
ये मिठीत, विनवितो तुला तुझा दास......

अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन

No comments: