Sunday, June 24, 2007

अस्तीत्व

घे माझा हातात हात आणी
सांग मला तुला काय सांगायचे आहे.
कुजबुज हळुवारपणे माझ्या कांनांत
सा~या त्या प्रेमाच्या गोड गोष्टी
घे मधाळ ओठांचे चुंबन,
चंदनि कायेला स्पर्श कर.
उफाळुन आण तुझ्यातली काम वासना.
कर विवस्त्र मला, अन घे बाहुपाशात.
तुझ्या बाहुपाशांत, विरघळेल, माझि भिति, माझ्या वेदना
ह्या रात्रीच्या अंधारात.
तुच माझी प्रेरणा,हो वाटाड्या.
उगवत्या सुर्य किरणात, सुध्धा
दे तुझे पंख मारु दे मला भरारी
अन उभारु दे मला असताना तु जवळ.
तोड माझी बंधने अन ये मम ह्रुदयात.
हिच वेळ रे ,कोसळलेली,बंधने बघण्याची.
अरे बंधनात होते मी, कर मोकळी सारी
तोड सा~या श्रुंखला, कर बंधमुक्त.
नाहि रे ताकद माझ्यात लढण्याची,
गरज आहे तुझ्या मदतीची.
मी तयार आहे.घे सामावुन तुझ्यात.
हे मुक्त तन,अन मन तुझ्यासाठीच आहे.
घे मिठीत ,अन विरघळुन जा माझ्यात.
उसळु दे प्रेमाच्या लाटा,येवु दे तुफान,
मिटवते माझ अस्तीत्व,तुझ्या अस्तीत्वात,

No comments: