Saturday, June 30, 2007

चांदणी तु शुक्राची


तु मुसमुसलेली, षोड्शा,सुंदर बाला,
घातला नजरेन,तु,ह्रुदयावर की घाला.
नजर धारधार, यौवनाचा कहर,
तु तिलोत्तमा नि रतीहुन भासे सुंदर.

साडीत लपेट्ले,गोरे कोवळे तन,
काचोळीत बांधले, खट्याळ ते यौवन
यौवन गंध दरवळे अवती भवती,
उन्मादक नजर आग भडकवे वरती.

तो मुखडा सुंदर,गोजिरा अन लाजरा
ते नयन चेट्की, त्यावर पापण्यांचा पहारा.
ओठांची महीरप,करे मम मनांस दंग
आत असे दंतपंक्ती कि शुभ्र मोत्याची रांग.

तु मधु शर्वरी, चांदणी तु शुक्राची
सुंदर चाफेकळी तु, कळी लावण्याची,
उतरली भु तळी रंभा की अप्सरा
वळती तुझकडे वारंवार की नजरा.

काय करावी शायरी तव रुपावर
शब्दांचा खजीना,अपुरा वाटे खरोखर
कीती करु गोळा मी शब्दांचे हे कण
नाही होत पुरे तव रुपाचे वर्णन

No comments: