Wednesday, June 20, 2007

ऑरकुट नामक जादुई नगर

ऑरकुट नामक जादुई नगर
मित्रांनो सारी गंमतच आहे.
आपण सगळेजण ह्या ऑरकुट नामक
जादुई नगरीत कैद झालो आहोत.
सगळेच एकमेकात आडकलो आहोत.
हा माझा मित्र, तो त्या मित्राचा मित्र.
सारे जण मैत्रीच्या धाग्यात बांधले आहोत.
एक गोड गुंता आहे. मस्त वाटत आहे.
ह्यातुन सुटण फार अवघड.
आहो माउलीनच म्हटल आहे,
लाकडी तुळया, लिलया पोखरणारा
भ्रमर, कमळात कैद झाल्यावर कमलदलाच्या,
पाकळ्या तोडुन उडुन जाउ शकत नाहि.
कमल उमलल्यावर उडुन जातो,
थोडक्यात आपल्या भाषेत,
"च्यायला,साल सगळ ऑरकुट होउन बसलय."

No comments: