या प्रियकराला,प्रित माझी कळेना..
अधरी अडकति शब्द ..भाषा डोळ्यांचि उमजेना
मास श्रावणाचा .,शशि तेवतो नभि
ते चांदणे हि शितल..पण तनुदाह सोसवेना
सुकुन गेले अधर..,कोमेजली काया.
कसा कठोर हा..मम दुःख्ख त्यास कळेना,,
आठवता छबि..विज तनुत कल्लोळे
रात्रभर ना डोळ्यास डोळा..ना पापणी मिटेना
वाटते असे..हे गुपित त्यास वदावे
हि लाज गडे मुलखाचि..पाठ माझी सोडेचना
avinash

No comments:
Post a Comment