Sunday, July 18, 2010

मिळता नजरेस नजर


मिळता नजरेस नजर
श्वास थांबुन गेला
मनात मन मोराचा
पिसारा फुलु लागला

कशी चुकवु नजर
जिव गोंधळुन गेला
त्या हस~या छबिचा
काळजाने ध्यास घेतला

त्याच्या लाघवि बोलण्यात
जिव रंगुन गेला
या बिन चेहे~याच्या जगात
वाटले साथी मिळाला

अधिर हव~या स्पर्शाने
तनुत चंद्र उजळला
चुंबिता कोवळे अधर
गात्री मदन सळसळला

लोचने त्रुप्त् झालि
स्वप्ने नयनी तरळे
प्रुथक् भाव् विरघळे
अद्वैत भाव आला

पुजले प्रेम दैवताला
कौमार्य नैवेद्य वाहिला
विश्वासु सखा होता तो
जिव्हारी घाव देवुन गेला

उतरता धुंदी प्रेमाचि
जगाचा व्यवहार कळाला
तो पहिला घाव
बरेच शिकवुन गेला

@...अविनाश. बेभान स्वछ्छंदि मुक्त जिवन

No comments: