Sunday, July 18, 2010

या गर्द नील नयनी


या गर्द नील नयनी, दाटून मेघ आले
का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..?

तुझ्या आठवणीने रे,मन कसे विभोर झाले
कसे आडवु आसवांना,नयनि पुर बघ आले.,

त्या प्रेम पावसाने,अशी चिंब चिंब भिजले
नाहि रे मी विझले,आत जळतचि राहिले

घेतले होते रे मिठित, चमकुन गेलि दामीनि
रान वारा उफाळला, या नाजुक बिलोरी यौवनि

अंग अंग गात्रांग,प्रीत रंगात नहाले
नेत्री आनंद आसवे,देहात चांदणे झळाले

ऎकता अनंग कथा,सहन हो‌ईना मदन चाळे
त्या काम दाहात, शरीर नाजुक होरपाळले

तु रमता धुंद यौवनि. मी तुझीच रे झालें
राखले होते जे तुजसाठी.ते तुला अर्पिलें


आठवता हे सारे नयनी, दाटून मेघ आले
अन मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..

Avinash

No comments: