Sunday, July 18, 2010

नाते जन्मोजन्मीचे

नाते जन्मोजन्मीचे
माझ्या घरावरुन तुझे ,रोज येणे जाणे असते
म्हणुन तर मी सजुन, रोज गॅलरीत उभि असते

एकदाहि नाहिस टाकिला तु, वर कधि कटाक्ष
समजेनासे झाले मजला, कसे वेधावे तव लक्ष

मुद्दामुन अनेकदा मी ,तुझ्या नजरे समोरुन गेले
पण नजरेचे तुझ्या अन माझ्या, मिलन नाहि झाले

तु असा कसा रे कलंदर, तुझ्याच विश्वात रमतो
हि वेडी तुजसाठी झुरते,तडफडते, हे कसे विसरतो

आवडतात तुला कविता ,असे मज बाहेरुन समजले
म्हणुन तर उद्देशुन तुला मी, प्रेम कविता रचत बसले

अनेकानि केली स्तुति,अनेकानी कौतुकाने थोपटली पाठ
नाहि आला तुझा अभिप्राय, ज्याचि होते पहात मी वाट

असशिल विश्वामित्र,स्वतःच्या विश्व निर्मितित दंग
मी पण बनुन मेनका ,नक्किच करेन तव तपोभंग

जरी वरवर दाखवित असशी मी तुझ्या खिजगणतित नाहि
ठावुक आहे तव ह्रुदयी ,मज वाचुन दुसरी कोणी नाहि

विश्वास आहे मज, तव हृदयी, मजसाठी फक्त प्रेम वसे
पति म्हणुन मी ,प्रियकरा तुजला जन्मोजमी ,वरले असे

Aavinash

No comments: