Monday, January 9, 2012

मुसळ धार पाऊस

मुसळ धार पाऊस
मुसळ धार पाऊस सुरु असतो व आपण झाडाच्या वा बस स्टॅण्डच्या आडोश्याला उभे असतो..पावसाने निम्मे तर भिजवलेले च असते..
काल झाला तसाच पाउस सुरु असतो..रस्त्यावर तुरळक वहातूक...गाड्या हेड लाईट फ़ुल ऑन करुन मंद गतिने धावत असतात..
वेगाने येण्या~या जलधारा अंगावर झेलत वसुंधरा त्रुप्त होत असते..बोचरे वहाणारे वारे झाडांशी लगट करित झाडे लयात हलत असतात....
वातावरणात एक सुखद गारवा पसरु लागतो....रस्त्या वरुन एखादा तरुण व त्याला मागुन घट्ट बिलगलेली तरुणी पावसाची मजा लुटत होंडा मोटर सायकल वरुन जाताना दिसते..

सारे जण अंग आखडुन उभे असतात. व चेहे~यावर कधि पाऊस थांबतो अन घरी पोहोचतो असा भाव असतो...

घरी बसलेली एखादी आजी नातु भिजून येणार म्हणून काळजीत असते..सोसायटी मधल्या चिल्या पिल्याना तर पाऊस म्हणजे पर्वणी..सारे आईचा ओरडा खात बाहेर भिजत खेळत असतात....

पावसाचा जोर कमी होतो...तरी बुरबुर चालुच असते...मोटर सायकल ला किक मारुन तसेच थोडेसे भिजत भिजत सारे जण घरच्या ओढीने निघालेले असतात...

बाल गंधर्व चौकात सालाबाद प्रमाणे तळे साठलेले असते ते सारे चुकवत चुकवत एकदाचे घर येते....

बेल वाजवून दार उघडल्यावर " मला वाटलच तुम्ही भिजले असणार" हातातला टॉवेल देत सौ म्हणते आधी केस पुसा...तुम्हि केस पुसुन अंग कोरडे करुन कपडे बदलता व हुश्य करुन सोफ्यावर रेलुन बसता अन ति समोर गरमा गरम कांद्या भज्याची बशी व वाफाळलेला चहाचा कप आणुन ठेवते....

पिठ भिजवुनच ठेवेल होत म्हटल तुम्ही आला कि गरम घाणा काढावा ..........ति म्हणते...

बोचरा गारवा..बाहेर रिमझिम व समोर गरमा गरम कांद्या भज्याची बशी व वाफाळलेला चहाचा कप सुख म्हणजे या पेक्षा काय निराळे असते....
पाऊस अन् कविता...पाऊस अन् छत्री...पाऊस अन् प्रेयसी यांचे अतूट नाते आहे तसे पाऊस अन गरमा गरम कांद्या भज्याची बशी व वाफाळलेल्या चहाच्या कपाचे पण...

अविनाश

No comments: