Monday, January 2, 2012

आळसावलेली दुपार..

आळसावलेली दुपार..

उन चांगलच जाणवत होत दुपारच..
घरी कुणीच नव्हत..
जेवल्यामुळे सार मन अन शरिर सुस्तावल होत.
कुठल तरी चटोर पुस्तक वाचत ति पलंगावर लोळत होति
वृत्ति जडशिळ झाल्या होत्या
अभ्यासा साठी मैत्रीण येणार होति
किति वेळ लावलास ग..आलेल्या मैत्रीणी कडे बघत ति म्हणाली
चल बसुयात का अभ्यासाला??
कंटाळा आला ग अभ्यासाचा ..म्हणत ति पण पलंगावर धबकली
काय वाचतेस..? ब~याच वेळ दोघि वाचत होत्या
ब~याच गपा झाल्या..डोळे जडावले होते..
आळसाने कमानि झाल्या होत्या शरीराच्या..
ब~याच कान गोष्टी झाल्या त्या दुपारी
ब~याच गोष्टी घडुन गेल्या त्या दुपारी
काहि आठवण्या जोग्या
काहि विसरण्या जोग्या
त्या आळसावलेल्या, सुस्त दुपारी.....
avinash

No comments: