Tuesday, January 17, 2012

घनदाट गर्द रेशमी केशकुंतल


घनदाट गर्द रेशमी केशकुंतल

घनदाट गर्द रेशमी केशकुंतल
नेत्रास कोरले काजळ कि सोमल
तनुत रातराणीची मादक दरवळ
गात्रात मदनाची बेफाम सळसळ

नजर, कधि लाजरी, कधि नाचरी
रतिरुप,नखशीकांत तु लावण्य परी
वाकलेली लज्जेने तु अबोध रमणी
रुप चमके,जशी नभी शुक्रचांदणी

वसने ,गर्भ रेशमी अंगी ल्याली
तव उरास काचे ,भर्जरी काचोळी
देहात रानवारा,उसळे उधाण लाटा
गालास खळी,अशी तु लावण्यकळी

अबोल पौर्णीमा, अन धुंद चांदणी
जवळ श्रुंगार वेडी,बेधुंद रागीणी
नाचति वक्षावर, चकोर मंडले बेभान
मुग्ध ति कुजबुज अन चोरटे अलिंगन ,

रोम रोम नशेने फुलले,श्वासात श्वास भिनले..
एक मेकाच्या सहवासात,बहरुन यौवन आले
तारुण्य अन यौवनाचा प्राशितो मी कण नी कण
ओंजळीत दिले मी तुजला,तृप्तिचे लक्ष लक्ष क्षण

Avinash

No comments: