Saturday, January 7, 2012

उर्ध्व रेता..


उर्ध्व रेता..
सनातन वैदिक धर्मात ब्रह्मचर्यास महत्व आहे...
ब्रह्मचर्य हेच जीवन विर्य नाश हा मृत्यु..असे आपणहि वाचले असेल...
पूर्वी वीर्य किंवा रेत याला फार महत्त्व होते. पुरुषाचे बल किंवा तेज त्याच्या वीर्यावर अवलंबून आहे असे समजत.
अन्ना पासून रक्त वगिरे प्रमाणे रेत वा वीर्य हि तयार होत असते..
मैथुन वा रतिक्रिया करताना रेतःस्खलन होते व वीर्य बाहेर पडते...हा शरीर धर्म आहे...
हट योगा मध्ये संभोग करीत असताना वीर्य बाहेर योनी कुंडात न टाकता पुन्हा शरीरात शोषून घ्यायच्या प्रक्रियेचे अत्यंत किचकट व अशक्यप्राय वाटणार्‍या कृती चे वर्णन व विवरण आहे.. व याने ब्रह्मचर्य टिकून राहतं असे असं म्हटलं होतं..
या योग क्रियेस ऊर्ध्व रेता असे नाव दिलेले वाचनात आहे..
शरीरात असणाऱ्या रसांना याविष्ठ बनवण्याची पद्धती म्हणजे प्राणायाम प्राचीन ऋषींनी प्राणाविदेचे रहस्य जाणून ज्या योगविद्येचा आविष्कार केला अनंतकाला पर्यंत हीच योगविद्या किंवा प्राणविद्या ही दीर्घायुष्य प्राप्तीसाठी सर्वोत्कृष्ट मानली जाईल. प्राणाची प्रतिष्ठाच अमृतत्व आहे. तर प्राणाची उत्क्रांती हा मृत्यू आहे. प्राणायमच कुण्डलिनी जागृती, उर्ध्वरेता होणे किंवा ब्रह्मचर्याच्या रक्षणाचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे.
रेतो वै प्राण:, प्राणो रेत: ।
प्राणच रेत अर्थात शुक्र किंवा सोमरस आहे. या रेताचे शरीरात सम्यक पचन होणे हेच ब्रह्मचर्य आहे. हेच परम तप आहे. हे ब्रह्मौदन परिपक्व झाल्यास अमृतत्व उत्पन्न होते
ब्रह्म चर्यात रती सुख वर्ज नसून वीर्य च्युत न होणे महत्त्वाचे मानले गेले आहे...
ब्रह्मौदन परिपक्व झाल्यास अमृतत्व उत्पन्न होते. हेच सोमपान होय.
यस्मात्पक्वादमृतं संबभूव यो गायत्र्याअधि पतिर्बभूव ।
यस्मिन्‌ वेदा निहिता विश्र्वरुपास्तेनौदनेनातितराणि मृत्यूम्‌ ।।
(अथर्ववेद 4.35.6)
जे ब्रह्मोदन शरीरात परिपक्व झाल्याने अमृत उत्पन्न होते जो गायत्री (ब्रह्मचर्याकाळ) चा सर्वेसर्वा आहे. आणि ज्यात विश्र्वरुप वेद स्थापित आहेत. त्या सिद्ध ओदन (रेटा) च्या माध्यमातून मी मृत्यूलाही ओलांडून पुढे जातो.
वैदिक भाषेत ब्रह्मांड किंवा मस्तिष्क हे स्वर्ग आहेत इन्द्राच्या इन्द्रिय शक्तीचा वास ब्रह्मांडातच राहतो. हेच संपूर्ण इन्द्रियांचं केंद्र आहे.
भगवान श्री कृष्णास "उर्ध्व रेता" वा "अच्युत" असेही संबोधण्यात येते..
तो तूं उर्ध्वरेता त्रिशुद्धीं । तुज भीष्म वंदी सर्वदा
नवलक्ष गोकंठपाशीं । तुज बांधवेना हृषीकेशी ।
असो वा नाथ भागवतात
घरीं सोळा सहस्त्र नारी । नांदसी एकलक्ष साठी सहस्त्र कुमरीं ।
तरी तूं बाळब्रह्मचारी । तुज सनत्कुमारीं वंदिजे
व कृष्णास प्रेमाने
उर्ध्वरेता श्रीकृष्ण ॥४॥ ज्या ज्या गौळियांच्या सुंदरी ॥ तितुक्याही होत्या निजमंदिरीं ॥ कृष्णें भोगिल्या बहुरात्रीं ॥ हेंच नवल पैं जाणा ॥५॥ तरी त्या वेदश्रुती सकळा ॥ निर्गुणरुप वर्णितां शिणल्या ॥ परी स्वरुपीं नाहीं ऐक्य जाहल्या ..
अशी वर्णने वाचण्यात येतात.....

रेत वर खेचल्याने मूलाधार चक्र ऍक्टिव्हेट होते व साधक मोक्षाच्या मार्गे चालू लागतो असे हि एक मत आहे.
शाक्त पंथा मधे हि साधना केली जाते व महत्त्वाची मानली जाते....
"म" साधना ज्या मधे मद्य..मुद्रा..मास..मैथुन हे प्रमुख घटक आहेत त्या मुळे ’उर्ध्व रेता" योग क्रियेने रतिसुख घेण्याची वर्णने पण वाचनात येतात...
काम शास्त्रात "समरति..व "विपरीत रति" असे दोन प्रकार वर्णन केले गेले आहेत..
समरति क्रियेमधे स्त्री वीर्य धारण करते व ति गर्भवती होती..तर विपरीत रति मधे पुरुष उर्ध्वरेता होत ब्रह्म पदास जाऊन पोहोचतो..
शिव शंकर हे परब्रह्म मानले गेले आहे...
शिव व शंकर हे एक नसून निराळे आहेत..शिव हे "तत्त्व" आहे तर शंकर हे मूर्त रूप मानले गेले आहे..
शिव हा ब्रह्मांडाचा महान तांत्रिक व मांत्रिक मानला जातो..
सा~या तंत्र विद्येचा ..गुप्त साधनांचा शिव हा कर्ता आहे...
व ह्या परंपरेत नाथ संप्रदायास अन्यानं साधारण महत्त्व आहे...
नाथ भक्तिसारातहि "उर्ध्व रेता" सिद्धीचा उल्लेख वाचनात येतो....

मच्छिन्द्रनाथ मजल-दरमजल करीत देशाटन करत असता आंध्रप्रदेशातील श्रीशैलम येथे पोचले. तेथे तांत्रिक योगिनींचा एक मठ होता.
या योगिनी सदासर्वकाळ विवस्त्र रहात असत. (त्यांचे केस इतके घनदाट आणि लांबसडक असत की त्यांची शरीरे झाकली जात.)
या योगिनींनी मच्छिन्द्रांना हटयोगातील वेगवेगळ्या आसनांचे आव्हान दिले. त्यातील बरीच आसने त्यांनी केली.
परंतु 'उर्ध्वरेता' या प्रकारात स्त्रीसंग अपेक्षित असतो. तो करताना ते मायेच्या बंधनात अडकले. पुढे १२ वर्षे ते त्या योगिनींच्या जाळ्यात अडकले. तेंव्हा त्यांना सोडवण्यासाठी त्यांचा शिष्य गोरक्ष तिथे पोचला. त्यालाही त्याच आव्हानांना सामोरे जावे लागले. 'उर्ध्वरेता' सकट सर्व आसने करून त्यांनी मच्छिंद्रांची मुक्ती मिळवली....
असे श्री ढेरे यांच्या"'नाथ संप्रदायाचा इतिहास' " मधे लिहिल्याचे आढळते....
ओशो यांच्या संभोगातुन समाधि कडे..मधे हेच तत्व असावे.
अर्थात हटयोग वा अश्या साधना गुरु शिवाय शिकणे कसे शक्य आहे?
गुरु वि्ण कोण दाखवील वाट...किती सार्थ आहे हा विचार..
अश्या सिद्धी येणारे अवलिये भेटणे व त्यांची कृपा होऊन हि रहस्ये समजणे हे भाग्याचेच लक्षण म्हणावे लागेल....
अविनाश

1 comment:

Unknown said...

सुंदर माहिती. अनेक वर्षांपूर्वी, नवनाथ कथासार वाचनात आले होते. तेंव्हापासून ह्या शब्दाबद्दल कुतूहल होते. आज अनवधानाने तुमचा लेख सापडला. धन्यवाद.