Thursday, September 20, 2012

कोजागरी


ति कोजागरी पौर्णिमेची रात्र होति
प्रणयिनि,तुझ्याच रुपाचि चर्चा होति...

कविता कोणावर करु,गहन प्रश्ण होता
एक चंद्र्मा नभात, तर एक बाहुपाशात होता..

यमक की, उपमा,उत्प्रेक्षा, का शब्द लावण्य पाजळु?
तु तर छंदबद्ध, तरी मुक्त छंदात लिहिण्याचा विचार होता

ते काम लाघवी स्पर्श शरीरात भिनले होते,
स्पर्श ताना तनुचा एक इंच हि तुकडा सुटला नव्हता

गर्भ रेशमी मिठी, साजणे घट्ट केली होतिस,
कळतय,रात्र जागवण्याचा तो इशारा होता

No comments: