Friday, November 30, 2007

केस विस्कटलेले, ओघळले काजळ गाली

केस विस्कटलेले, ओघळले काजळ गाली
रागाने चेहेरा लाल,आठी शोभते भाळी

किति समजावु,किति सांगु?तुज पटवु कसे?
भार्ये,तुज वाचुन ,मम ह्रुदयी दुसरी कोण वसे?

काल भेटली ति मम कार्यालयीन सहकारी होति,
रीत म्हणुन थांबलो, बोलायाची तसदी घेतली होती

मोजुन १० मिनिटे पण तिच्याशी नाहि बोललो सखे
तरी तासभर "गुलुगुलु" चालले होते तुज का वाटे असे?

जनरीत म्हणुन स्मीत हास्य करुन तिच्यासंगे बोललो
तरी का म्हणते "लघळ, पघळ पणे" वागलो?

कार्यालयीन कामात सहकार्य देइन असे मी म्हटले,
तरी "लोचटा सारखा पुढे पुढे करतो" तुज असे का वाटले?

ति सुमार रुपांची, साधारण तरुणी असे,
तरी"मेली,चटक चांदणी, नट मोगरी" का तुज भासे?

मी सभ्य, संयमीत,साधारण पुरुष हे तुज ज्ञ्यात आहे,
असे "बावळटच" त्याना आवडतात असे का सुनावत आहे?

विधिवत पाणी ग्रहण करुन,मी हातात घेतला हात
कशी सोडिन मी, सखे, मधुनच तुझी साथ ?

हे विधात्या, तु हिला,लावण्य, सौंदर्य बहाल केले
पण, रुख्मीणी ऎवजी भामेचे मन का दिले?

अविनाश..२९/११/२००७

No comments: