Wednesday, November 28, 2012

रोमॅंटीक

एका समुहावर मी लिहिलेले.........
रोमॅंटीक हि एक भावना आहे..प्रेम भावनेतुन निर्माण होणा~या प्रणय रम्य कल्पना व त्यातुन निर्माण होणारा आवेग जो साथीदाराच्या व आपल्या मनाला आनंद देतो.....
रोमॅंटीक कल्पना म्हणजे नुसती गुलाबाची फुले वा महागड्या भेटवस्तु नाहित तर साध्या साध्या गोष्टीतुन हि त्या व्यक्त होत असतात..
सुनिता व विजय यांच्या काम काजाची एकच वेळ असायची..तिला तो रोज वाटेवर असलेल्या बॅंकेत सोडायचा व पुढे कारखान्यात जायचा..
परवाच तो तिला ऑफिस ला सोडताना मधेच रस्त्यावर थांबला..
अन मोबाईल करु लागला..
कुणाला करतोस..नंतर कर ना प्लीज आधीच उशीर झाला आहे..ति आर्जवाने म्हणाली..
थांब..त्याने हातानेच खुण करीत सांगीतले.
त्याने फोन तिच्या बॅंकेत लावला होता..
सर..मी सुनिताचा पति बोलतोय....तिला जरा बरे नाहि..म्हणुन ति आज ऑफिस मधे येवु शकणार नाहि...तो बोलत होता..
सुनिता चपापलीच..पण त्याने खुणेनेच तिला गप्प रहाण्याचा ईशारा केला..
नाहि फार जास्त नाहि..उद्या कामाला येईल..
ओ.के..सर..थँक्स.. म्हणत त्याने फोन बंद केला..
काय प्रकार आहे तिला कळतच नव्हते..विचारल्यावर तो म्हणाला...
बघ हवा मस्त पडली आहे..आज दांडी..आता डायरेक्ट लोणावळा.....
ति चकित झाली व मोहोरली....तु म्हणजे असा आहेस ना..रोमॅंटीक..
अश्या छोट्या कल्पना रोमांच व मजा निर्माण करतात..
व सहजिवनात बहार आणतात..
उत्कट प्रेमातुनच ह्या कल्पना येत असतात.

No comments: