Wednesday, November 28, 2012

Mama's Boy -

Mama's Boy -

 Mama's Boy -  म्हणजे आई वेडा  असे म्हटले तर वावगे ठरणार नाही..
मुलाला आई बद्दल प्रेम आदर भावना उपजत असतेच.
पण काही मुले जरा जास्त आईवेडी असतात..म्हणजे ...mommy's boy
ही मुले  समस्या असली कि आईचा सल्ला हमखास घेतात..जरी त्या समस्ये वर मित्र वा परिवारातील इतर कुणी मत दिले
तरी आईच्या सल्ल्याला ते मान देतात ..जास्त वजन देतात..
आईच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर जादा प्रभाव असतो.
अशी मुले आईला आवडेल..बर वाटेल असे वागण्यात धन्यता मानतात..त्यात त्यांना एक मानसिक सुख मीळत असते.
साधारण पणे आईवेडी मुले यांचा अर्थ आपल्या कडे विपरीत घेतला जातो..
पुरुषा मधे स्वयं निर्णय क्षमता असावी असा एक आग्रह असतो..
अश्या आई वेड्या व्यक्ति.ओव्हर प्रोटेक्टेड..निर्णय घेण्यास असमर्थ असेच मानले जाते.
मुली वर जरी वडिलांचा ज्यादा प्रभाव असला व वडिल मुलीचे आयुष्य़ व एकंदरीत सा~याच बाबतित.जागरुक असले तरी तरी त्यांना daddy’s girls असे समजले जात नाहि..
किंबहुना मुलीचे रक्षण व तिचे भले वा हित हे वडिलांचे कर्तव्यच समजले जाते..
मात्र ह्या आईवेड्या मुलांचे लग्ना नंतर खुप भावनिक हाल होतात..
सहचारीणीस आईच्या पदरा आड लपणारे हे मुल डोकेदुखी ठरते..व त्यातुन कौटुंबीक ताण तणाव निर्माण होतात..
त्यातुन हा आईवेडा मुलगा जर सौम्य स्वभावाच असेल तर आईचे ऐकु कि पत्निचे? यात मनाने फाटला जातो..
असे हि असते कि काहि स्त्रीया आपल्या मुलाबाबत जास्त आक्रमक असतात..मुला बाबत आपल्या शिवाय कोणाला जास्त
कळते हि कल्पना त्यांना मंजुर नसते..एक प्रकारची मालकि हक्काची भावना असते,..
खास करुन वैधव्य आलेल्या स्त्रीया ज्या मुलांना खस्ता खावुन वाढवतात. व मुलगा सुस्थितित असतो अश्या स्त्रीया.त्यांच्या शी बोलले की किति कष्टातुन मुलाला वाढवले व इत पर्यंत आणले या बाबतचे त्यांचे अनुभव व गाथेतुन अहंकार जाणवत असतो..
रत्नाकर मतकरींच्या कथेवर एक छान सिनेमा पण या विषयावर आलेला होता..रिमा लागु यांनी आईची भुमीका साकारली होति.
सायको सिनेमात हि आईच्या व्यक्तिमत्वाचा नॉर्मन वर इतका प्रभाव असतो कि मृत्यु नंतर हि आई त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक हि्स्सा बनुन रहाते..व कथानक मनाची पकड शेवत पर्यंत सोडत नाहि..
मानवि मन..गहिरे मानवी नाते संबंध हे साहि्त्यिक..कवि..सिनेमा सा~यांच्या चिंतनाचे चिरंतन विषय आहेत व रहाणार..यात शंका नाहि.

No comments: