Tuesday, June 28, 2016

दोन लघुतमकथा ..
..........................
१)एका लहानशा खेड्यात तो एकान्तवासांत राहतं होता...
साथीला त्याचा लाडका इमानी कुत्रा...
पुढे तो महानगरात शिफ्ट झाला..
महानगर म्हणजे वेगवान जीवन..माणसांची गर्दी..
तो हळूहळू माणसात मिसळू लागला...
जस जसा तो माणसात मिसळू लागला संवादु लागला....
तसतसे त्याला आपला लाडका कुत्रा जास्त आवडू लागला
.........
२)तरुणपणीच त्याला असाध्य अश्या हृदय विकाराचा रोग मागे लागला..
सकाळ दुपार संध्याकाळ गोळ्या घेत आयुष्य कंठत होता....
आईस खूप काळजी वाटायची. तो कंटाळा करायचा म्हणून आई त्याला आठवणी ने गोळ्या देत असे..गोळ्या घेण्याची आठवण करून देत असे...
.
कामानिमित्त त्याला प्रथमच परदेशी जावे लागले....
विमानाने उड्डाण घेतले व एअर होस्टेस त्याच्या जवळ आली व म्हणाली..." थेट मागच्या सिटवर तुमची आई बसली आहे तिने मला तुम्हाला निरोप द्यायला सांगितले की परदेशी निघाला आहेस औषधाच्या गोळ्या न चुकता घे म्हणून.." व ति निघून गेली...
त्याने पाऊच मधून गोळी काढली व घेतली..व त्याच्या डोळ्यांना अश्रूंची धार लागली..
.
आईचा मृत्यू होऊन आता वर्ष लोटले होते..
असो जिवंत वा मृत ......आई तुमची कायम काळजी घेत असते

No comments: