Tuesday, November 13, 2007

काय पाहिले तु तिच्यात इतके,

काय पाहिले तु तिच्यात इतके,
अन सोडुन दिलास माझा हात

किति करत होते मी प्रेम
का मधुनच सोडलीस साथ

अडगळीत पडली ओष्ठ शलाका
त्या गंधकुप्या,त्यांचा उपयोग नाहि

कशास सावरु हे केश कूंतल
छेडण्यास त्यांना तु नाहि.

कोरडी पडली अधर पाकळी
उष्टावण्यास सख्या तु नाहि

नकोच तो रंगीत बांगड्यांचा चुडा
नको ते हसणे अन, चांदण्याचा सडा

प्रेम मुर्ती होतिस तु माझी
पुजेस कौमार्य पुष्प मी वहिले

अरे क्रुर, विश्वास घातक्या ,प्रियकरा
सोडताना एकदाहि मागे न पाहिले

कोसळले होते, पण पुन्हा उभी राहिले
आठवण येता तुझी मग डोळी नीर का आले???

No comments: