Sunday, November 22, 2009

कुंकवाच्या धन्यान अशी रात जागवली

सखे काय सांगु.
कुंकवाच्या धन्यान अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटु दिली

घेता मिठीत त्याने,आग अंगास लावली
अधराने अधारावर प्रेम कविता कोरली
सुटले भान पदराचे, गळुन पडली चोळी
कुंकवाच्या धन्यान अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटु दिली

स्पर्शिता उरोज त्याने,श्वास माझे थांबले,
धुंद मिटल्या नयनि,कामस्वप्ने तरळले
गात्र गोजिरी स्वप्ने फुलली,कामग्लानी आली
कुंकवाच्या धन्यान अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटु दिली

डवरला होता पारीजात,गंध भिने तनुत
शरद चांदणे जणु ,निथळत होते देहात
मोहरला गौर देह,कळ सुखाचि गात्रात आली
कुंकवाच्या धन्यान अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटु दिली

अंगास भिडले अंग,ना दुजाभाव राहिला
कमळात जसा भ्रमर,तसा गात्रात प्रवेशला
वादळी आवेग त्याचा,तनु रतिसुखाने भिजली
कुंकवाच्या धन्यान अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटु दिली

अधरावर दंतव्रण ,वक्षावर नखक्षते कोरली
तनुत स्वर्ग सुखाची लाटे वर लाट आली
मदनाचि कैक कारंजी गात्र गात्रात उसळली
कुंकवाच्या धन्यान अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटु दिली

No comments: