Tuesday, June 28, 2016

माधव न्याशनलाईझ ब्यांकेत कामाला होता...
वडलोपार्जित ब्लॉक..वडील देवाघरी गेलेले होते..
घरात फक्त आई अन तोच राहायचा..
माधव चे लग्नाचे वय झालेच होते..१-२ मुली पण पाहिल्या होत्या पण त्याला पसंत नाही पडल्या...
*
दुपारच्या वेळी शेजारच्या जोशी काकू गप्पा मारायला आलेल्या होत्या..
गप्पा गप्पात जोशी काकूने सुचवले..म्हणाल्या की.."माझी दूरची साठे नावाची आते बहीण आहे तिची माधवी नावाची मुलगी लग्नाची आहे...चांगले लोक आहेत...मुलगी बी कॉम झाली असून आता कॉम्प्युटरचा कोर्स करत आहे..नाकी डोळी नीटस आहे.. आपल्या माधव साठी स्थळ बघायचे का?"
हरकत नाही..मुलगी व परीवर तुमच्या नात्यातला व पाहण्यातला आहे .." आई म्हणाल्या...
*
रात्री आई ने माधवाजवळ विषय काढला माधवाने पण मुलगी बघण्यास संमती दर्शवली...
*
साठ्यांच्या घरी "कांदे पोहे" प्रोग्राम झाला..माधवी दिसायला सुंदर होती..शिवाय संस्कारी परिवार होता...
माधवाला माधवी आवडली..व त्याने आपला होकार कळवला
*
माधवी ला पण माधव पसंत होता..माधवचा होकार येताच साठे परिवाराचे मन "गार्डन गार्डन" झाले.
योग्य मुहूर्त पाहून माधव व माधवी विवाह बंधनात अडकले व संसार रथ मार्गक्रमण करू लागला..
*
वटपौर्णिमेचा दिवस होता..माधवी ची पहिली वटपौर्णिमा...माधवी फार आधुनिक पण नव्हती वा फार पारंपरिक..तिने लहान पणा पासून आईस वड पुजताना पाहिले होते कथा पण ऐकल्या होत्या..पण आज तिला पुजा करायची होती..
माधवी नटली होती..नाकात नथ व अंगावरील अलंकाराने तिचे उपजत सौंदर्य खुलले होते..
माधव ने तिला पाहिले व या रूपांत पहाताच माधव चकित झाला..
"खूप छान दिसते आहेस"..माधव म्हणाला..ति गोड हसली..
चला म्हणजे आता सात जन्म अशी बायको मिळणार यावर शिक्का मोर्तब झाले म्हणायचे...माधव हसत म्हणाला...
अरे सात जन्म का? मला तू खुपा आवडतोस ..आपले नाते जन्म जन्मांतराचे आहे..तू कुठेही असलास तरी तुला माझ्या कडे खेचून आपणण्याचे सामर्थ्य माझ्या प्रेमात आहे..."माधवी म्हणाली...
अग तू नुसती साद घाल आहे तिथून तुझ्या कडे येईन " माधव हसत म्हणाल...
बोलायला तू अस्सा आहेस ना? चल सोसायटीतल्या बायका माझी खाली वाट बघत असतील...पूजेसाठी" असे म्हणत माधवी गेली.
*
सायंकाळी ऑफिस मधून माधव आला..गरमागरम चहाचा कप माधवी न माधवला दिला..ती जवळ येताच त्याला "अमृतांजन"चा उग्र वास दरवळल्याचे जाणवले...."का गं?? बर नाही का? डोके दुखते का?
नाही रे थोडं दुखत आहे सकाळापासून..गोळी घेतलीय.....माधवी म्हणाली..
*
सकाळी उठल्यावर माधवने विचारले कसे आहे डोके???
नाही रे अजून दुखतेच आहे...माधवी..
काळजी घे आराम कर...
*
१-२ दिवस गेले पण डोके थांबण्याचे नाव घेईना..
आता मी तुझं ऐकणार नाही अजिबात गेली ३-४ दिवस बघतोय..चल आधी दवाखान्यात जाऊ...माधव म्हणाला
अहो किरकोळ आहे थांबेल...माधवी...अजिबात नाही तयार हो आपण दवाखान्यात जातोय...माधव निर्वाणीचा आदेश दिला अन माधवी तयार झाली....
*
माधव तिला घेऊन नेहमीच्या डॉक्टर कडे गेला.त्यांनी तपासले व चिठ्ठी लिहितं म्हणाले मला वाटते तुम्हाला काही टेस्ट कराव्या लागतील ..अस करा तुम्ही "दीनानाथ" मध्ये जा..व या डॉ. ना भेटा...."
डॉक्टर काही काळजीचे कारण तर नाही ना? माधवाने विचारले..
तुम्ही रिपोर्ट आणले मी सांगू शकेन...वा तिकडचे डॉक्टर सांगतील.
*
माधव माधवी ला घेऊन दीनानाथ मध्ये गेला...
डॉक्टरने सा-या टेस्ट्स केल्या...रिपोर्ट आले..त्यांनी माधवला एकट्याला आत बोलवून घेतले.
माधव..माधवी चे सारे रिपोर्ट्स मी पाहिले..तिच्या मेंदूवर एक मोठा फोड वा पुळी आली आहे..ऑपरेशन हाच एकमेव मार्ग आहे...डॉक्टर म्हणाले..
माधव मात्र हे ऐकून घाबरला....तसं घाबरायचं कारण नाही...पण ति पुळी काढणे आवश्यक आहे..
केव्हा करावे लागेल हे ऑपरेशन?/
लवकरात लवकर अगदी उद्या सुद्धा..वेळ दवडण्यात अर्थ नाही....
डॉक्टर मी बोलतो अन १०-१५ मिनिटात तुम्हाला सांगतो..तिच्या आई बाबांना कल्पना देतो..
शुअर.. डॉ. म्हणाले
*
माधवने आईबाबा ना फोन केला व जवळचा एक मित्र होता त्याला पण फोन करून बोलविले..
सारे आले..
आईबाबांना धक्काच बसला..माधवी ला पण काय करावे कळत नव्हते..शेवटी सर्वांनी चर्चा करून ऑपरेशन उद्याच करावे असा निर्णय घेतला व डॉक्टरांना कळवला....
आम्ही आमच्या कडूनं प्रयत्न करूच..शिवाय ऑपरेशन झाल्यावर त्यांना आराम पण वाटेल डॉक्टर म्हणाले...
*
माधवी ला ऍडमिट करून घेतले...
माधव तिच्या बेडजवळ बसून होता..बघ ना अचानक काय झाले ते...माधवी म्हणाली..
काळजी नको करूस तू ठीक होशील...माधव ने तिला धीर दिला...मला जगायचं आहे रे..तुझ्या सोबत...माधवी म्हणाली
माधवी तुला काही होणार नाही....
*
११ च्या सुमाराला माधवीला ऑपरेशन थिएटर मध्ये हालवले..
बाहेर माधवी चे आई बाबा माधव ची आई मित्र माधव सारे प्राण कंठाशी आणून माधवीची वाट बघत होते..
डॉक्टर बाहेर आल्यावर सा-यानी त्यांना गराडा घातला..
माफ करा माधव..वर दिसणारी पुळी जरी लहान असली तरी क्यान्सर मेंदूत आत खोलवर पसरला होता...आम्ही नाही वाचवू शकलो
माधवी बॉडी थिएटर मधून बाहेर आली...
खेळ संपला होता..
माधव भकास पणे हताश होऊन सारे बघत होता...
*
काळ पुढे सरकत होता..माधव माधवी ची आठवण आली की व्यथित होत असे..
पहिले वर्ष श्राद्ध आले त्या वेळी माधवी चे आईबाबा ...साठे काका आले होते..
नाही म्हटले तरी दुःखाचा जोर ओसरलेला होता..
गप्पांच्या ओघात साठे काका म्हणाले..माधवराव..एक विचार व्यक्त करतो..माधवी गेली..ती ईश्वरेच्छा..ते आपल्या हातात नाही..तुम्ही तरुण आहात व उभे आयुष्य आपल्यापुढे वाढून ठेवले आहे..अशा वेळी साथीदाराची गरज असते..तुम्ही पुनर्विवाह करावा व नव्या आयुष्यास सुरवात करावी..आम्ही पिकली पाने केव्हाही गाळून जाऊ....
माधव काहीच बोलला नाही..मात्र "माधवीची खूप आठवण येते" असे म्हणाला..यावर काका म्हणाले मान्य आहे पण आठवणीवर आयुष्य जगता येत नाही..आपण सुज्ञ आहात..काय पटेल तो निर्णय घ्या.
काही दिवसातच माधव ने पुनर्विवाह केला..रेवती शी लग्न लावले व संसार सुरू झाला...
रेवती फार सुंदर नव्हती पण गृहकृत्य दक्ष होती...
*
आज वट पौर्णिमेचा दिवस होता..अनायासे माधवाला पण सुटटी होती..
तू पुजा करणार आहेस का आज? माधवने विचारले...
खरं तर माझा फारसा विश्वास नाही अश्या गोष्टीवर..पण तुम्हा म्हणत असाल तर करेन पुजा..पण उपास करणे जमणार नाही....रेवती म्हणाली...
हरकत नाही... केली तर आनंदच आहे नाही केली तरी हरकत नाही....माधव म्हणाला...
दुपारी रेवती तयार झाली..व म्हणाली मी तयार आहे चला आपण जाऊ वड पुजायला...
माधवने तिला एका वडाच्या झाडाजवळ नेले दुपारची वेळ होती..गर्दी पण नव्हती...
तू पुजा उरकून घे ..असे म्हणत तो बाजूला बाक होता त्यावर जाऊन बसला.
रेवती पुजा करू लागली अन अचानक वडाच्या झाडावरून एक स्त्री दणकणं खाली आली..तिचे केस पिंजारलेले होते डोळ्यात क्रुद्ध भाव होते..तिला पाहताच रेवती घाबरली...
तू माधवची दुसरी बायको ना? तिच्या आवाजात जरब होती...हो रेवती तत फफ करत म्हणाली पण तू कोण?/तुला पाहिल्यासारखे वाटते...
मी माधवी माधवची प्रथम पत्नी..त्याने मला ७ जन्म एकत्र राहण्याचे वचन दिले होते...
तिचा तो आवेश बघता रेवती घाबरली व चक्कर येऊन पारावर पडली...
तिथून माधवी माधव कडे आली तो मोबाईल वर मेसेज वाचत होता...
माधव..असे म्हणताच त्याने समोर पाहिले माधवीला पाहताच तो आश्चर्य चकित झाला...तू????
हो मी च...आठवतंय ना ७ जन्म एकत्र राहण्याचा आपला संकल्प होता...
माधव नखशीकांत घामाने डबडबला होता...
हो पण तूच सोडून गेलीस...चाचरत माधव म्हणाला...
अरे पण वड पुजला आहे..त्याचे बळ माझ्यात आहे..तुला आठवते.तू म्हणाला होतास.."खूप छान दिसते आहेस"..त्यावर मी गोड हसले
चला म्हणजे आता सात जन्म अशी बायको मिळणार यावर शिक्का मोर्तब झाले म्हणायचे...तू हसत म्हणाला...
अरे सात जन्म का? मला तू खूप आवडतोस ..आपले नाते जन्म जन्मांतराचे आहे..तू कुठेही असलास तरी तुला माझा कडे खेचून आपणण्याचे सामर्थ्य माझ्या प्रेमात आहे..."असे मी म्हणाली...
अग तू नुसती साद घाल आहे तिथून तुझ्या कडे येईन " हे तुझेच शब्द आहेत ना???
जर सावित्री मृत्यू लोकातून सत्यवानाला इहलोकात परत आणू शकते तर मग मी तुला मृत्युलोकात का नाही घेऊन जाऊ शकत...असे बोलत ती विकटपणे हसली
माधव तिचे बोलणे ऐकून घाबरला...नको गं ..मी इथेच बरा आहे...
नाही..ति डोळे विस्फारत म्हणाली तुला माझ्या बरोबर यावेच लागेल असे म्हणत तिने त्याचा हात धरला...
अन दोघेही इहलोकातून अंतर्धान पावले.
*
थोड्या वेळातच रेवती शुद्धीवर आली..तिने आकांताने माधवला हाक मारली..पण ओ आली नाही..
ति पारावरून खाली उतरली..पण माधव दिसेना तिने बरेच शोधले..व कंटाळून घरी आली..
सर्व ठिकाणी तिने माधव चे चौकशी केली पण माधव सापडेना..ति भय कंपित झाली..
शेवटी तिने पोलिस ठाण्यात "मिसिंग " ची तक्रार नोंदवली..
बरेच दिवस ति ठाण्यात चकरा मारत होती..पण माधव सापडला नाही...
*
अमावास्येची रात्र होती ..रेवती झोपली असताना साधारण १२-१२.३० च्या सुमारास तिला जाग आली.
बेडरूम एकदम थंड पडली होती..बहुतेक खिडकी उघडी राहिली असावी असे म्हणत ति उठली..
कोप-यात एक पांढरी आकृती उभी होती..
ति घाबरली तिने नाइट दिवा लावला....
कोप-यात एक व्यक्ती उभी होती..सारे शरीर त्याचे सुताच्या धाग्याने गुंढाललेले होते फक्त चेहरा उघडा होता..
तिने पाहिले तो माधव होता ....चेहरा भयानक झाला होता ती किंचाळणार तेव्हढ्यात माधव म्हणाला.......
रेवती मी माधव आहे..आता मी या जगात नाही..माधवी ने सुताच्या साहाय्याने मला जखडले आहे...माझा शोध घेणे थांबव...मी निघतो..." असे म्हणत ति आकुती वायू रूपाने खिडकीतून बाहेर गेली..व सुताचा ढिगारा कोप-यात कोसळला..
हे सारे बघताच रेवतीची शुद्ध हरपली...
तिच्या मुखातून"माधव तू कुठे आहेस" एव्हढेच शब्द निघाले...

No comments: